दूध दूध दूध दूध, दूध है वंडरफुल !! 

माझा आजचा विषय खुप सामान्य आहे, तो म्हणजे दूध. मृन्मयी झाल्या पासून मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी चा विचार करते. तिला काय खायला दयायचे, कोणते कपडे घालायचे, कोणत्या क्रीम लावायच्या, कोणता बेबी ब्रैण्ड तिच्यासाठी बेस्ट आहे आश्या अनेक गोष्टी.
जेव्हा पासून ती वरचे दूध प्यायला लागली तेव्हा पासून माझी नवी शोध मोहीम सुरु झाली. दूध कोणत्या ब्रैण्ड चे दयावे. 😀 माझ्या काही अनुभवी मैत्रिणींचा सल्ला घेऊ असा विचार केला. एक मैत्रीण म्हणाली, कलाश्री बाळाला पिशवी चे दूध देऊ नकोस, ते जराही चांगले नसते. तु वुहु ब्रैण्ड चे दूध दे बाळाला, ते बेस्ट आहे. यू नो त्यात खुप कैल्शियम आहे, ते शुद्ध आहे, आर्गेनिक आहे आणि साय तर फार घट्ट येते. तु पिऊन पहा, तुला लक्षात येईल. मी ते दूध प्यायले, पण normal दूध जसे लागते ते तसेच होते. तिच्या समोर मी बोलले, “वोव, इट्स ऑसम” आणि तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले. 😀
माझ्या ऑफिस मधील नवीन आणि अनुभवी आईंच्या ग्रुप मध्ये हा चर्चे चा विषय होता. त्यात काही स्त्रीया मुलांना कंट्री डिलाइट, हंपी, प्राइड, वुहु, काही बंदी चे दूध तर काही पिशवी चे दूध बाळाला देत होत्या, आमची एक अनुभवी फ्रेंड म्हणजेच आमच्या आई ग्रुप ची डॉन म्हणाली , “कोण देते बाळाला पिशवी चे दूध ? शी बाई, माहिती आहे का, मी माझ्या बेबी ला आईआईटी पास आउट स्टूडेंट ने सुरु केलेल्या कंपनी चे दूध देते. तुला माहिती आहे ना, आईआईटी चे स्टूडेंट कीती कीती ब्राइट आसतात”. मी विचारले, “ते दूध चांगले आहे का ?”.🧐 तिच्या चेहऱ्यावर आगदी चित्रविचित्र भाव उमटले आणि ती मला रागवत म्हणाली, “काय कलाश्री, आईआईटी वर संशय”, अग ए२ मिल्क आहे ते, माहिती आहे का ?हाइजेनिक आणि प्रोटीन युक्त. स्वच्छतेत ठेवतात गाई म्हशींना, समझले का? आजकाल देशी आणि गिर गाई चे दूध सगळेच देत नाहीत. गाई च्या नावाख़ाली कोणता हायब्रीड प्राणी बनवला आहे कोण जाणे.” 😳 मी माझी मान हलवत होकार दर्शवला. 😕तीतक्यात माझी दुसरी मैत्रीण बोलली, “ए कलाश्री तू माझे ऐक. आईआईटी, फियायटी काही ऐकु नको. तीणे मान उंचावून अगदी अभिमानाने सांगीतले, “ मी माझ्या बाळाला ज्या गोठ्यातले दूध देते, त्या गोठ्यातल्या गाईंना गायत्री मंत्र आणि गीतेचे अध्याय ऐकवले जातात. पहा, म्हणजे त्या गाईंवर चांगले संस्कार होतात आणि दूधवाटे ते आपल्या मुलांवर होतात.” आता मी हया सगळयांचे विचार ऐकून अचंबित होत होते. 🤓🤨🥸
जेव्हा मी लहान होते तेव्हा मला आठवते की आई ने एका गोठ्याचे दूध लावले होते, अतिशय घट्ट होते ते दूध. मला आठवते, आई म्हणायची, बोट बुडवीले तरी बोटाला चीकटेल असे दूध ते. खरोखर भाकरी सारखी साय होती त्या दूधाला. कालांतराने आई ने ते दूध सोडले कारण ते काका नंतर गाई म्हशीना इंजेक्शन देत होते. त्यामुळे दूध अतिशय पातळ येई.मग आई ने नवीन दुधवाल्या काकांची सर्विस ऑप्ट केली. एका महिन्यानंतर आईने काकांकडे तक्रार केली, “अरे!!! दूध आगदी पातळ येत आहे, मी आज तक्रार केली तर उदया तुम्ही चांगले देता आणि नंतर पहिले पाढे पंचावन्न”. त्याने आगदी डॉक्टर जसे पेशंट चे ऐकून घेतात तसे शांततेत ऐकले आणि म्हणाला, काकु, नार्मल दूध २३ रुपये, जरा चांगले दूध ३० रुपये, घट्ट दूध ४० रुपये. आता बोला तुम्हाला काय हवे आहे. आई क्षणभरासाठी स्तब्ध झाली, मग म्हणाली, थोडे पैसे कमी करा आणि ते ४० रुपये वाले दूध ३० ला दया. पुढे ३२ वर सेटलमेंट केली त्यांनी. आई त्याला बोलली, “आम्हाला जे दूध देशील त्या गाई ला मुळीच इंजेक्शन नको देउ रे बाबा. आम्हाला प्योर दूध च हवे.”(औंधकरांचा दिवा पीत होता ना ते दूध, आईला कळकळ असणारच.) 🙈🙈 दूधवाला हसत हसत म्हणाला, “नाही हो काकु, नाही देत आम्ही इंजेक्शन”. आता खरे काय ते तो एक्स दूधवालाच जाणे. 👻
असाच सिमिलर किस्सा माझ्या बरोबर माझ्या सोसाइटी मध्ये घडला, फक्त पैसे काळानुसार जास्त होते.
सगळे ब्रैण्ड ट्राय करुन फाइनली आता मी मृन्मयी ला आमच्या शेजारच्या डेयरी चे दूध देत आहे. दूध चांगले आहे आणि ती पीते. बस आझुन काय पाहिजे.
बरेच ब्रैण्ड आहेत, कोणता बेस्ट आहे ते मला माहिती नाही, कारण सगळेच स्वतःची ब्रैंडिंग बेस्ट करतात.मी त्यातली काही तज्ञ नाही, मला सगळेच सिमिलर वाटतात.
काही दिवसांपूर्वी मी माझ्या सासरी गेले होते, तिकडे मला एक गृहस्थ भेटले. त्यांचे स्वतःचे शेत होता. त्यांच्या कडे अनेक देशी आणि गीर गाई व म्हशी होत्या, ज्या शहरातील प्रदूषणा पासून दूर गावात ठेवल्या होत्या. ते मला म्हणाले, आमच्य येथे गाईंना चाराच खाऊ घातला जातो. शहरात असणारे बरेच गोठे हया गाईंना मानवी आहार जास्त प्रमाणात देतात. मुळात पोळी भाजी हा गुरांचा आहार नाही, चारा हाच त्यांचा योग्य आहार. आश्या गाई चे दूध मला आजच्या काळात माझ्या बाळासाठी मीळाले त्यातच माझा आनंद. आता मी सुद्धा माझे अनुभव मोठया अभिमानाने प्रश्न विचारणाऱ्याला सांगते. 😀 कधी कधी नवखी आई दिसली तर चालता बोलता फ्री सल्ले देऊन मोकळी होते. 😂

तुमची प्रिय,
कलाश्री उर्फ कुचकट कलाश्री.

तळटीप –
माझी आई ग्रुप ची डॉन मैत्रीण व माझा भाऊ उर्फ आमचा दिवा, मनावर घेणार नाही असे मी समझते. 🙈
काय ना, मिर्ची मसाला लावला नाही तर माझ्या लेखाचा अपमान होईल आणि त्यात तुम्ही माझे जीवस्य कंठस्य, तुम्ही राग मानणार नाहीत हा माझा अंधविश्वास. 😜😝🤓🤓🤓🤓

Leave a Comment